नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. जेव्हा करोनाची लस भारतात येईल तेव्हा ती देशातील प्रत्येक नागरिकाला देण्यात येईल. कोणालाही यापासून वंचित ठेवलं जाणार नाही, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. वृत्तवाहिनीला मुलाखत देताने त्यांनी हा दावा केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटले कि, करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं वेळेवर महत्त्वाची पावलं उचलली. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचवण्यात आपल्याला यश मिळालं. लॉकडाउन लागू करण्याचं आणि अनलॉक करण्याची वेळही योग्यच होती, करोनाचं संकट अद्यापही कायम आहे. अशा परिस्थितीत सर्वांना सतर्क राहणं आवश्यक आहे. प्रामुख्यानं सणासुदीच्या वेळी सर्वांनी सतर्क राहिलं पाहिजे. कोणत्याही प्रकारची सूट देण्याची ही वेळ नाही, असंही त्यांनी नमूद केलं.