SHO seriously injured due to sword attack on Singhu border
देश

लाल किल्ला हिंसाचार प्रकरण : तलवार घेऊन हिंसाचारात सहभागी असलेल्या मुख्य आरोपीला अटक

प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅलीत झालेल्या हिंसाचाराप्रकरणी पोलिसांनी आणखी एका मुख्य आरोपीला अटक केली आहे. त्याच्या घरातून पोलिसांनी दोन तलवारी जप्त केल्या आहेत. याप्रकरणी अभिनेता दीप सिद्धू याला पोलिसांनी यापूर्वीच अटक केलेली आहे. दीप सिद्धूबरोबरच महिंदर सिंग मुख्य आरोपी असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

महिंदर सिंग असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून तो लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारातील मुख्य आरोपी असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. हिंसाचाराच्या घटनेपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. ३० वर्षीय महिंदर सिंग दिल्लीतील स्वरूप नगर येथील रहिवासी आहे. त्याला पितमपुरा बस स्थानकाजवळ दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली.

दिल्ली पोलिसांनी हिंसाचाराचे मिळालेले व्हिडीओ तपासले होते. या व्हिडीओत महिंदर तलवार घेऊन हिंसाचारात सहभागी असल्याचं दिसत आहे. पोलिसांनी महिंदरच्या घराची झडती घेतली. तिथून पोलिसांनी दोन तलवारी जप्त केल्या असून, आरोपी महिंदर सिंगची चौकशी केली जात आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत