gang rape on corona positive woman

चोरीच्या उद्देशानं घरात घुसले, विलगीकरणात असलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार

क्राईम देश

इंदौर : चोरीच्या उद्देशानं घरात घुसलेल्या नराधमांनी एका महिलेवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. तीन नराधमांनी चाकूचा धाक दाखवत महिलेवर बलात्कार केला. कोरोनाची लागण झाल्यामुळे ही महिला विलगीकरणात राहत होती. नराधमांनी 50 हजार रुपये आणि मोबाईल तर चोरलाच पण या महिलेवर सामूहिक बलात्कार देखील केला. ही घटना मध्य प्रदेशातील इंदौर येथे घडली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

इंदौरच्या लसूडिया ठाणा क्षेत्रातील पंचवटी कॉलनीत राहणाऱ्या 37 वर्षीय महिलेच्या घरी हा प्रकार घडला. पीडिते महिलेने पोलिसांना सांगितलं की कोरोनाबाधित असल्यानं ती घरी एकटीच विलगीकरणात राहत होती. गुरुवारी रात्री दोन वाजता तिला जाग आली त्यावेळी तिच्या बेडशेजारी तीनजण उभे होते. त्यांनी चाकूचा धाक दाखवत तिच्याकडे पैसे आणि दागिने मागितले. महिलेने त्यांना घरात असलेले 50 हजार रुपये आणि दोन मोबाईल दिले. परंतु, तेवढ्यावर त्यांचे समाधान झाले नाही. त्या तिघांनीही संधी साधून महिलेवर सामूहिक बलात्कार केला. त्यांच्या हातात चाकू आणि कात्री असल्यामुळे हत्येच्या भितीने तिने आवाज केला नाही. त्यानंतर बराच वेळ एक आरोपी या तरुणीच्या घराबाहेरच थांबला. सकाळ झाल्यानंतर त्या आरोपीने तेथून पळ काढला.

महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार तीन अज्ञातांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. शुक्रवारी सकाळी या महिलेची मेडिकल टेस्ट करण्यात आली. पोलिसांनी तपास सुरु केला आणि सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवली. यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर, तिसरा आरोपी फरार आहे. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी अल्पवयीन आहेत. या दोघांनीही गुन्हा कबूल केला आहे. यातील एकाच नाव दीपक असून तो अजूनही फरार आहे. तो युवतीचा शेजारी आहे. दोन महिन्यांपूर्वीच तो तुरुंगातून बाहेर आला होता. त्याची माहिती देणाऱ्यासाठी 20 हजाराचं बक्षीस जाहीर कऱण्यात आलं आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत