Four arrested for Kidnapping for ransom

धक्कादायक : कार्यालयात घुसून मारहाण आणि खंडणीसाठी अपहरण, चार जणांना अटक

क्राईम पुणे महाराष्ट्र

पुणे : चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोमवारी (१० मे) सकाळी एक धक्कादायक घटना घडली. एका इसमाचे त्याच्या बाणेरमधील कार्यालयात जाऊन चार जणांनी खंडणीसाठी अपहरण केले. त्यानंतर आरोपींनी या इसमाकडे असणारा मोबाईल, अंगठी, घड्याळ आणि एटीएम कार्ड काढून घेऊन 15 लाख रुपयांची खंडणी मागितली. पोलिसांनी या आरोपींना अटक केली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, चार जणांनी सदर इसमाला त्याच्या बाणेरमधील क्रिस्टल एम्पायर येथील कार्यालयात जाऊन मारहाण केली. त्यानंतर या व्यक्तीला त्याच्याच कारमध्ये जबरदस्तीने बसवून त्याचे अपहरण केले आणि सुस येथील ऑडी शोरूममध्ये नेले. तेथून मुळशी तालुक्याच्या परिसरात एका शेतामध्ये असलेल्या तंबूत नेऊन त्याचे तोंड, हात आणि पाय बांधून ठेवले. तिथे मारहाण करुन त्याच्याकडे असणाऱ्या मोबाईल, अंगठी, घड्याळ व एटीएम या सर्व वस्तू काढून घेतल्या. त्यानंतर 15 लाख रुपये खंडणी देखील मागितली. खंडणी मागितल्यानंतर त्या व्यक्तीने अकाऊंट मधून पैसे काढून आणून देण्याची तयारी दाखवली. मग त्यांनी या व्यक्तीला १२ मे रोजी दुपारी दीड च्या सुमारास पुन्हा सुस येथील ऑडी शोरूम येथे सोडून दिले. त्यानंतर या व्यक्तीने तात्काळ या घटनेबाबत चतु:श्रृगी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.

हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दादा गायकवाड, यांनी दोन पथक तयार केले. त्यानंतर या गुन्हयातील आरेापींचा शोध सुरु करण्यात आला. तपासादरम्यान या गुन्हयातील आरोपी मोहित वेदपाठक व त्याचे साथीदार मुळशी परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन दोन्ही टिमने त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला. तेथे मोहित हेमंत वेदपाठक (३२), अक्षय दिलीप गिरीगोसावी (27), मारूती नंदू पवार (३४) आणि नरहरी मोतीराम भावेकर (३१) हे चारही आरोपी उपस्थित होते. पोलिसांनी आरोपींची सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. या आरेापींनी फिर्यादीकडुन काढुन घेतलेला सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत