कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा छोटा भाऊ आशिम बॅनर्जी यांचे निधन झाले आहे. आशिम बॅनर्जी यांना एक महिन्यापूर्वी कोरोनाची लागण झाले होती. त्यांना कोलकाताच्या मेडिका सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, तेथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, उपचारांना यश आले नाही आणि आज सकाळी रुग्णालयात त्यांचे निधन झाले.
मेडिका हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. आलोक रॉय यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आशिम बॅनर्जी यांच्यावर कोरोना प्रोटोकॉलचे पालन करून अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
Heartfelt condolences to West Bengal @MamataOfficial on losing her younger brother Ashim Banerjee ?? pic.twitter.com/pKpEwDgHeO
— Rajan Tewari (@Rajan_Tewari) May 15, 2021




