India has suffered a lot due to Covid says Donald Trump

आम्ही चांगले काम करतो हे दाखवण्याची भारतीयांची सवय, पण कोरोनामुळे भारत उद्धवस्त झालाय – डोनाल्ड ट्रम्प

कोरोना ग्लोबल

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना विषाणूच्या संसर्गावरून पुन्हा एकदा चीनवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की कोरोनाच्या संसर्गामुळे जगात भारतासह बरेच देश उद्धवस्त झाले आहेत. तसेच कोरोना विषाणू चीनची निर्मिती असल्याचं म्हणत चीनने अमेरिकेला नुकसानभरपाई म्हणून १० ट्रिलियन अमेरिकन डॉलर देण्याची मागणी देखील ट्रम्प यांनी केली. तसेच झालेले नुकसान यापेक्षा खूप मोठे असल्याचे देखील ते म्हणाले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, मला वाटते की कोरोना विषाणू कुठून आला हे शोधणे फार महत्वाचे आहे. तसेच विषाणूची गळती होणे हा अपघात असला तरी अनेक देशांवर त्याचा वाईट परिणाम झाला आहे. याआधी असे कधीच घडले नव्हते. भारतातही कोरोनाचे थैमान सुरू आहे. आम्ही किती चांगले काम करत आहोत हे दाखवण्याची भारतीयांची सवय आहे. मात्र, सत्य परिस्थिती वेगळी आहे. भारत कोरोनामुळे उद्धवस्त झाला आहे. जगातील जवळपास सर्वच देश कोरोनामुळे अक्षरशः उद्धवस्त झाल्याचे ट्रम्प यांनी म्हटले.

ट्रम्प पुढे म्हणाले की वस्तुस्थिती ही आहे की अनेक देश उद्धवस्त  झाले आहेत. मला आशा आहे की चीनने हे जाणूनबुजून केलेले नसावे.” आपल्या देशाला देखील कोरोनाचा खूप मोठा फटका बसला. पण इतर देशांवर त्याचा खूप मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळेच मला वाटते की कोरोना विषाणू कुठून आला हे शोधणे फार महत्वाचे आहे. आणि चीनने देखील नक्कीच मदत केली पाहिजे. सध्या चीन आणि अमेरिका या दोनच अर्थव्यवस्था वेगाने सुधारत आहे.”

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत