नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा भारत दौरा ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस होणार असल्याची माहिती रशियन वृत्तसंस्था इंटरफॅक्सने दिली आहे. ही माहिती भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या हवाल्याने गुरुवारी मॉस्कोमध्ये प्रसिद्ध करण्यात आली. भारत-रशिया द्विपक्षीय संबंधांच्या दृष्टीने ही भेट अत्यंत महत्वाची ठरणार आहे. डोभाल सध्या रशियाच्या दौऱ्यावर असून तेथे विविध उच्चस्तरीय बैठकींना […]
टॅग: डोनाल्ड ट्रम्प
भारत स्वतःची काळजी घेऊ शकतो, ॲपलने अमेरिकेत उत्पादन वाढवावे – डोनाल्ड ट्रम्प
अमेरिका : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ॲपलच्या भारतातील वाढत्या उत्पादन योजनेवरून मोठे वक्तव्य केले आहे. दोहा येथून बोलताना ट्रम्प यांनी ॲपलचे CEO टिम कूक यांना थेट सल्ला दिला की, “भारतात कारखाना सुरू करू नका, अमेरिकेतच गुंतवणूक करा.” ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर ‘मेक इन इंडिया’ मोहिमेसाठी ही एक मोठी अडचण ठरू शकते. ट्रम्प म्हणाले, […]
आम्ही चांगले काम करतो हे दाखवण्याची भारतीयांची सवय, पण कोरोनामुळे भारत उद्धवस्त झालाय – डोनाल्ड ट्रम्प
वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना विषाणूच्या संसर्गावरून पुन्हा एकदा चीनवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की कोरोनाच्या संसर्गामुळे जगात भारतासह बरेच देश उद्धवस्त झाले आहेत. तसेच कोरोना विषाणू चीनची निर्मिती असल्याचं म्हणत चीनने अमेरिकेला नुकसानभरपाई म्हणून १० ट्रिलियन अमेरिकन डॉलर देण्याची मागणी देखील ट्रम्प यांनी केली. तसेच झालेले नुकसान यापेक्षा खूप […]
डोनाल्ड ट्रम्प यांचे फेसबुक खाते दोन वर्षांसाठी निलंबित
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फेसबुकने मोठा झटका दिला आहे. फेसबुकने शुक्रवारी ट्रम्प यांचे सोशल मीडिया अकाउंट 2 वर्षांसाठी निलंबित केले. यासोबतच भविष्यात नियम मोडणाऱ्यांशी कसा व्यवहार केला जाईल, याचीही घोषणा केली आहे. फेसबुकच्या स्वतंत्र निरीक्षण मंडळाने मे महिन्यात डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील सोशल मीडिया जायंटचे निलंबन कायम ठेवले आहे, जे अमेरिकन संसदेवर 6 जानेवारी […]
राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी रद्द केला डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ वादग्रस्त निर्णय
अमेरिकेचे ४६वे अध्यक्ष म्हणून जो बायडेन ज्युनियर आणि अमेरिकेच्या ४९व्या उपाध्यक्ष म्हणून कमला हॅरिस यांनी बुधवारी शपथ घेतली. या शपथविधीनंतर काही तासांमध्येच बायडेन यांनी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक महत्वपूर्ण निर्णय रद्द केला. बायडेन यांनी पॅरिस हवामानबदलविषयक करारामध्ये अमेरिका पुन्हा सहभागी होणार असल्याची घोषणा केली. वृत्तानुसार, राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी बुधवारी अमेरिकेला पॅरिस हवामानबदलविषयक करारामध्ये […]
…तरच मी व्हाईट हाऊस सोडायला तयार आहे- डोनाल्ड ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाउस सोडण्यासाठी एक अट ठेवली आहे. जर इलेक्टोरल कॉलेजकडून जो बायडन यांना अधिकृतपणे विजेता म्हणून घोषित करण्यात आलं तर मी व्हाईट हाऊस सोडायला तयार आहे, असं विधान ट्रम्प यांनी केलं आहे. निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरूवारी पहिल्यांदाच प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले कि, इलेक्टोरल कॉलेजनी जो […]
डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर मान्य केला पराभव, सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया सुरु
अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या जो बायडन यांची अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचा पराभव अमान्य करुन पद सोडण्यास नकार दिला होता. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तीन आठवडे झाले तरी ट्रम्प आपल्या निश्चयावर ठाम होते. निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचं सांगून त्याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. आता मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता […]
अखेर सातारा पॅटर्न यशस्वी, जो बायडन होणार अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष
जो बायडन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला असून तेच अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष होणार आहेत हे आता स्पष्ट झालं आहे. काही वेळापूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी ही निवडणूक जिंकल्याचा दावा एका ओळीचं ट्विट करुन केला होता. मात्र प्रत्यक्षात जो बायडन यांनी ही निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे अमेरिकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष हे जो बायडनच होतील यात काही शंका […]







