पुणे: माझी मुलगी कुठे आहे? माझी मुलगी मला जिवंतच मिळाली पाहिजे. असा सवाल रागिणी गमरे त्यांनी प्रशासनाला विचारला आहे. माझी मुलगी प्रिया गायकवाड चा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तिला ससून रूग्णालयातून अॅम्ब्युलन्समधून जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. याठिकाणी उपचार सुरू असल्याचे कोविड सेंटरतर्फे सुरूवातीला सांगण्यात आलं होतं. मात्र, प्रिया गायकवाड ही महिला बरी झाल्यानंतर तिची आई सदर महिलेला घरी घेऊन जाण्यासाठी जम्बो कोविड सेंटरमध्ये आली असता, आईला तुमची मुलगी येथे अडमिटच नव्हती, अशी धक्कादायक माहिती देण्यात आल्यानंतर आईला मात्र मोठा धक्काच बसला. दरम्यान जम्बो कोविंड सेंटरमधून बेपत्ता झालेल्या आपल्या पोटच्या गोळ्यासाठी आता या माऊलीने उपोषणचा मार्ग निवडला आहे.
दरम्यान या सदर प्रकरणाची चौकशी उपायुक्त दर्जाचे अधिकाऱ्यांशी समन्वय साधत असल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त रुबल अग्रवाल यांनी दिली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या सगळ्यांनी या प्रकारात लक्ष घालण्याची गरज आहे. संस्थात्मक रचनेतून गेलेल्या महिलेचा २० दिवस तपास लागू शकत नाही हे दुर्दैवी आहे, अशी टीका स्थानिक प्रशासन आणि सरकारवर केली जात आहे.




