मध्य प्रदेश : महिलेने तिच्या पतीची अतिशय निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली आहे. रागाच्या भरात या महिलेने पतीचे नाजूक अंगही कापले. त्यानंतर तिने गळफास लावून आत्महत्या केली. मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यातील बाग या गावात ही खळबळजनक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेचा पती शिक्षक होता. त्याची आणखी एक पत्नी होती आणि याच कारणावरून पती-पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. काल रात्रीही या दाम्पत्याचा वाद झाला. त्यानंतर महिलेने आपल्या मुलांना खोलीच्या बाहेर काढलं आणि दरवाजा बंद केला. रागाच्या भरात पत्नी राधाबाई हिने धारदार शस्त्राचा वापर करून पती हरेसिंग चौहान यांच्यावर हल्ला केला. तिने पाटीवर अनेक वर केले, त्यानंतर त्याचे नाजूक अंगही कापून टाकले. जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे हरे सिंग यांचा मृत्यू झाला. त्यानंतर या महिलेने साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
पोलिसांनी सांगितले की या शिक्षकाची आणखी एक पत्नी होती आणि त्यावरून या दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचे. काल रात्रीदेखील त्यांच्यात भांडण झालं आणि त्यातून महिलेने हे भयंकर कृत्य केलं. ही घटना घडली त्यावेळी मुलं बाहेर ओरडत होती, पण महिलेने काहीही ऐकलं नाही.




