TRP scam: Bark suspends news channels TRP

टीआरपी घोटाळा : बार्कने वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर आणली तीन महिन्यांसाठी स्थगिती

देश

मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळ्याचा पर्दाफाश केल्यानंतर ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिलने (BARC) मोठा निर्णय घेतला आहे. बार्कने वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर तीन महिन्यांसाठी स्थगिती आणण्याचा निर्णय घेतला आहे. बार्कने निर्णय जाहीर करताना टीआरपी मूल्यमापनाची सध्याची पद्धत आणि यंत्रणेतील दोष दूर करण्यासाठी काय करता येईल याचा आढावा घेणार असल्याचं सांगितलं आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

बार्कच्या निर्णयाचं न्यूज ब्रॉडकास्टिंग असोसिएशनकडून (NBA) स्वागत करण्यात आलं आहे. बार्कने योग्य दिशेने पाऊल टाकलं असल्याची प्रतिक्रिया एनबीएकडून देण्यात आली आहे. बार्कने हा १२ आठवड्यांचा अवधी आपल्या पूर्ण यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी तसंच देशात काय पाहिलं जातं यासंंबंधी विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी वापरावा असं मत एनबीए ने व्यक्त केलं आहे.

बार्क म्हणजेच ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सील (बीएआरसी/बार्क) इंडिया नावाचा एक संयुक्त उद्योग उपक्रम आहे. हा उपक्रम प्रसारणकर्ते (आयबीएफ), जाहिरातदार (आयएसए) आणि जाहिरात तसेच प्रसारमाध्यमांशी संबंधित संस्थेचे (एएएआय) प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकांच्या माध्यमातून हाताळला जातो. टीव्ही वाहिन्यांच्या कामकाजाचे मोजमाप करणारी ही जगातील सर्वात मोठी संस्था आहे. बीएआरसी इंडिया सन २०१० मध्ये सुरु करण्यात आली. या संस्थेचे मुख्य कार्यालय मुंबईमध्ये आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत