राफेल या लढाऊ विमानांची दुसरी बॅच भारतात दाखल झाली आहे. ही माहिती भारतीय वायुसेनेने दिली आहे. फ्रान्सहून ३ राफेल लढाऊ विमाने काल संध्याकाळी ८.१४ मिनिटांनी भारतात पोहोचली आहेत. ही विमाने फ्रान्सहून थेट भारतात दाखल झाली आहेत.
Second batch of IAF #Rafale aircraft arrived in India at 8:14 pm on 04 Nov 20 after flying non-stop from France.
— Indian Air Force (@IAF_MCC) November 4, 2020
फ्रान्सहून निघालेल्या या विमानांच्या सोबत फ्रान्स एअर फोर्सचं मिड एअर रिफ्युलिंग एअरक्राफ्ट सुद्धा सोबत होतं. भारतात तीन राफेल विमाने दाखल झाल्यामुळे आता भारतीय वायुसेनेकडे एकूण आठ राफेल विमाने झाली आहेत. यापूर्वी २९ जुलै रोजी पाच राफेल लढाऊ विमानांची बॅच भारतात दाखल झाली होती. ही विमाने १० सप्टेंबर रोजी अंबाला येथे आयोजित एका कार्यक्रमात ‘गोल्डन एरोज स्क्वॉड्रन’मध्ये सहभागी झाली होती.
भारत सरकारने फ्रान्समधील दसॉल्ट कंपनीसोबत ३६ राफेल विमाने खरेदी करण्याचा करार केला आहे. फ्रान्समधून भारताला जुलै २०२० ते एप्रिल २०२१ या काळात २१ राफेल मिळणार आहेत. ३६ विमाने खरेदी करण्यासाठी भारताने एकूण ५९ हजार कोटी रुपयांचा करार केला आहे.