पुणे महाराष्ट्र

दारू पिण्यास पैसे न दिल्याने पत्नीवर कुऱ्हाडीने वार, आरोपी पतीला अटक

पुणे : दारू पिण्यास पैसे न दिल्याने पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तळजाई वसाहतीत हा प्रकार घडला असून या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत पतीला अटक केली आहे. पूनम दत्ता अडागळे (वय ३२, रा. खंडाळे चौक, तळजाई वसाहत, पद्मावती) असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. सहकारनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी दत्ता राजाराम अडागळे (वय ३८) याला अटक करण्यात आली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दत्ता याचा पूनमशी २०१५ साली विवाह झाला होता. तो काहीही कामधंदा करीत नाही. त्याला दारू पिण्याचे व्यसन आहे. त्यांना सात वर्षांचा मुलगा आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पूनम घरकाम करते. सोमवारी (३१ मार्च) रात्री आठच्या सुमारास आरोपी दत्ता हा दारू पिऊन घरी आला. त्यानंतर त्याने दारू पिण्यासाठी पत्नी पूनमकडे अजून पैसे मागितले. मात्र तिने पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर आरोपी दत्ता याने रागाच्या भरात पूनमवर कुऱ्हाडीने हल्ला केला. पूनमने आरडाओरडा केला मात्र, त्यांच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव बसला आणि त्यात पूनमच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, पोलिसांनी आरोपी दत्ता याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक रेखा साळुंके तपास करत आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत