One month old girl recovered fully from corona after 10 days on ventilator

10 दिवस व्हेंटिलेटरवर राहिल्यानंतर एक महिन्याच्या बाळाने हरवलं कोरोनाला, डॉक्टर म्हणाले…

कोरोना देश

भुबनेश्वर : ओडिशा येथील भुबनेश्वरमध्ये मागील महिन्यात जन्मलेल्या एका मुलीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. या बाळाला जगन्नाथ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ती केवळ एक महिन्याची होती, जेव्हा तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. 10 दिवसांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर अखेर या बाळाने कोरोनाला हरवलं आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

या नवजात बाळावर उपचार करणार्‍या नवजाततज्ज्ञ डॉ. अर्जित मोहपात्रा यांनी माहिती दिली की जवळपास दोन आठवडे या प्राणघातक विषाणू बरोबर संघर्ष केल्यानंतर ती बरी झाली आणि तिला बुधवारी (१२ मे) रुग्णालयातून सोडण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की जेव्हा या बाळाला त्यांच्याकडे आणले होते, तेव्हा बाळाला खूप ताप आलेला होता, अल्प आहार मिळाला होता, बाळ कोमेजलेलं होतं आणि श्वासोच्छवासाची देखील समस्या होती. अनेक प्रकारचे उपचार आणि प्रक्रियेनंतर अखेर आम्ही तिला व्हेंटिलेटरवर ठेवले होते.

डॉक्टरांनी पुढे खुलासा केला कि, “या बाळाला रेमडेसीवीर आणि इतर अँटीबायोटिक्स दिली. रेमडेसीवीर नवजात शिशुंना सपोर्ट करतं की नाही, याबाबत कोणतेही संशोधन नसल्यामुळे, डॉक्टरांनी बाळाच्या आई-वडिलांच्या परवानगीनेच हे औषध दिलं, कारण ती बाळासाठी जीवन आणि मरणाची गोष्ट झाली होती.”

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत