Shiv Sena leader Sudhir Suri was shot dead in broad daylight

शिवसेना नेते सुधीर सुरी यांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या

देश

पंजाब : पंजाबमधील अमृतसरचे शिवसेना नेते सुधीर सुरी यांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अमृतसर येथील गोपाळ मंदिराबाहेर सुधीर सुरी शुक्रवारी धरणे आंदोलन करत होते. यावेळी सुरी यांच्यावर गोळीबार करण्यात आला, यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबचे शिवसेना नेते सुधीर सुरी यांच्यावर अमृतसर शहरात गोपाळ मंदिराबाहेर गोळ्या घालण्यात आल्या. गोपाळ मंदिराच्या बाहेर कचऱ्यात देवांच्या मूर्ती आढळल्यानं ते मंदिराबाहेर धरणे आंदोलन करत होते. यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमले होते. दोन मारेकऱ्यांनी गर्दीतून पुढे येत सुधीर सुरी यांच्यावर जवळून गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात सुधीर सुरी यांचा मृत्यू झाला आहे.

पंजाब पोलिसांनी सुधीर सुरी यांच्या एका मारेकऱ्याला अटक केली आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. सुधीर सुरी यांच्यावरील हल्ला सुनियोजित असल्याची माहिती मिळाली आहे. सुरी यांच्यावर हल्ल्याची योजना मागील काही दिवसांपासून सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिस मारेकऱ्याची कसून चौकशी करत आहेत. दुसरा मारेकरी फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत