11 People Died In A Bus Accident Which Collided With A Car

गावी निघालेल्या मजुरांचा मध्य प्रदेशात भीषण अपघात, 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू, पंतप्रधानांकडून मदत जाहीर

देश

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशात झालेल्या भीषण अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील पार्टवारा रोडवरील झाल्लार गावात रात्री दोन वाजेच्या सुमारास बस आणि तवेरा कारची धडक होऊन जीपमधील 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये 5 पुरुष, 4 महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे. एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

बैतुलचे पोलीस अधीक्षक सिमला प्रसाद यांनी सांगितले की, रिकाम्या जाणाऱ्या एमपी 48 पी 0193 या बसची आणि तवेरा कारची धडक झाली. कारमधील सर्व लोक मजूर आहेत जे महाराष्ट्रातील कळंबा येथून आपल्या गावी परतत होते. कारचे काही भाग कापून मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ही धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला. याशिवाय बसच्या पुढील भागाचेही नुकसान झाले आहे. या अपघातात बसचालक यशवंत पार्टे जखमी झाला. माहिती मिळताच बैतुलचे जिल्हाधिकारी आणि एसपीसह अन्य अधिकारी घटनास्थळी पोहोचले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान सहायता निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

कामगार 20 दिवसांनी घरी परतत होते
बैतूल जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 35 किमी अंतरावर असलेल्या परतवारा मार्गावरील झाल्लार गावात बस आणि तवेरा यांच्यात झालेल्या धडकेत प्राण गमावलेले 11 जण सुमारे 20 दिवसांनी आपापल्या घरी परतत होते. महाराष्ट्रात मजूर म्हणून काम करून परतत असताना एका अपघाताने त्यांचा जीव घेतला. ते ज्या तवेरामध्ये परतत होते, त्या तवेराच्या चालकाला अचानक डुलकी लागल्यामुळे तवेराचे नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगात ती बसवर धडकली. जिल्हाधिकारी अमनबीर सिंह बैंस यांनी सांगितले की, बस आणि जीपच्या धडकेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मेंढा, चिखलर आणि महातगाव येथील सहा पुरुष, तीन महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे.

या अपघातातील मृतांची नावे

  1. लक्ष्मण सुखराम भुस्मकर (30)
  2. किशन लीलाजी मावस्कर (32)
  3. कुसुम किशन मावस्कर (28)
  4. अनारकली केजा मावस्कर (35)
  5. संध्या केजा मावस्कर (5)
  6. अभिराज केजा मावस्कर (वय दीड वर्ष)
  7. सहबलाल धुर्वे (वय 35)
  8. मंगल नन्हेसिंग उईके (37)
  9. नंदकिशोर धुर्वे (48)
  10. श्यामराव रामराव झारबडे (40)
  11. रामकली श्यामराव झारबडे (35)
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत