amit shah

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रुग्णालयात दाखल; श्वसनास त्रास

कोरोना देश राजकारण

दिल्ली:  अमित शाह यांना श्वास घेण्यात त्रास होत असल्याने तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यामुळे काल (शनिवार) रात्री उशिरा त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात (Aiims Hospital) दाखल (Admitted) करण्यात आलं आहे.  रुग्णालयाकडून अद्याप यासंदर्भात कोणतेही मेडिकल बुलेटीन देण्यात आलेले नाही. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या नेतृत्वात डॉक्टरांच्या टीमद्वारे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या क्षणी त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते आहे. यापूर्वी, १८ ऑगस्ट रोजी कोरोनातून बरे झाल्यानंतरही पोस्ट कोव्हिड केअरसाठी त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

दोन आठवड्यांच्या उपचारानंतर त्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली होती. त्यानंतर १४ ऑगस्ट रोजी त्यांची कोव्हिड चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले होते. मात्र चार दिवसांनी पुन्हा त्यांना अंगदुखीचा त्रास जाणवल्याने एम्समध्ये पोस्ट कोव्हिड केअरसाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, आता श्वसनासंबंधी त्रास जाणवू लागल्याने पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत