Drugs Case Arrest KJ
देश मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

नार्कोटिक्स ब्युरोचे गोवा आणि मुंबई येथे छापे; ६ जणांना अटक

मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (Narcotics Bureau) शनिवारी मुंबई आणि गोवा येथे रात्री उशिरा अनेक ठिकाणी छापे टाकून सहा जणांना अटक केली आहे. मध्य मुंबई आणि पश्चिम उपनगरामध्ये काही ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. यावेळी करमजीत सिंह आनंद या नावाच्या एका तरुणाला ड्रग्स प्रकरणातील तपासासंदर्भात अटक करण्यात आली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

आरोपी करमजीत याच्याकडून गांजा, चरस आणि बंदी घालण्यात आलेले अनेक अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. अधिकाऱ्याने असेही सांगितले की, एनसीबीच्या पथकाने गांजाचा संशयित पुरवठादार डेव्हन अँथनी फर्नांडिस आणि दादर येथील इतर दोघांना ताब्यात घेतले. या तिघांकडून ५०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. याशिवाय त्यांनी अशीही माहिती दिली की, अंकुश अरेंजा नावाच्या व्यक्तीला मुंबईच्या उपनगरातून अटक करण्यात आली आहे.

एनसीबी अधिकाऱ्याने अरेंजाकडूने जवळजवळ ४२ ग्रॅम चरस आणि १,१२,४०० रुपयांची रोख रोकड जप्त केली. तर दुसर्‍या छाप्यात एनसीबीने ख्रिस कोस्टा या ड्रग पेडलरला गोव्यातून अटक केली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत