टेनेसी : 1990 च्या दशकात ‘टार्झन’ या टीव्ही मालिकेत टार्झनची मुख्य भूमिका निभावणारा अभिनेता विल्यम जोसेफ लारा (Joe Lara) यांचे विमान अपघातात निधन झाले आहे. शनिवारी विमान क्रॅश होऊन झालेल्या अपघातात 58 वर्षीय जो, त्यांची पत्नी ग्वेन लारा यांच्यासह अन्य पाच जण ठार झाले. जो यांच्यासह इतर 6 जण एका छोट्या जेटमध्ये प्रवास करत होते, ते नॅशविलेजवळील टेनेसी सरोवरात कोसळले. याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत.
रिपोर्ट्सनुसार, ब्रॅंडन हाना, ग्वेन एस. लारा, विल्यम जे. लारा, डेव्हिड एल. मार्टिन, जेनिफर जे. मार्टिन, जेसिका वॉल्टर्स आणि जोनाथन वॉल्टर्स अशी विमान अपघातात ठार झालेल्यांची नावे असून हे सर्वजण टेनेसी येथील ब्रेंटवुडचे आहेत. पोलिस जो यांच्यासह इतर सहा जणांच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत. रविवारी रदरफोर्ड काउंटी फायर रेस्क्यूचे कॅप्टन जॉन इंगल यांनी सांगितले की Smyrna जवळील पर्सी प्रिस्ट लेक येथे शोध मोहीम सुरु आहे. तलावाच्या सभोवतालच्या भागात पसरलेल्या दुर्घटनाग्रस्त विमानाच्या भागांची तपासणी केली जात आहे.
थरकाप! १३ वर्षीय मुलीची ११४ वेळा भोसकून निर्घृण हत्या
टार्झन ही एक अमेरिकन मालिका होती, ज्याचा एक सिझन 1996 ते 1997 दरम्यान प्रसारित झाला होता. या मालिकेत टार्झनच्या जंगलातून मानवी संस्कृतीत जाण्याची आणि लग्न करण्याची कहाणी दर्शविली गेली. दक्षिण आफ्रिकेतील सन सिटी रिसॉर्ट येथे या मालिकेचे चित्रीकरण करण्यात आले होते.
जो लारा यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1962 रोजी सॅन डिएगो येथे झाला होता. त्यांनी मॉडेलिंगद्वारे आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली आणि त्यानंतर त्यांना टार्झनमध्ये मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. जो यांनी 1996 ते 1997 दरम्यान टार्झन मालिकेच्या 22 भागांमध्ये आपली अभिनय क्षमता दर्शविली. जो अमेरिकन सायबोर्ग स्टील योद्धा, स्टील फ्रंटियर, वॉरहेड, डूम्सडे, आणि टार्झन व्यतिरिक्त टीव्ही शो बेवॉच आणि कोनान द अॅडव्हेंचररमध्ये काम केले होते. त्यांना याअगोदर २०१८ मध्ये समर ऑफ 67 या चित्रपटामध्ये शेवटचं बघितलं होतं.
जो यांचे ग्वेनशी लग्न झाले होते. दोघेही आपल्या दोन मुलींसह ब्रेंटवुडमध्ये राहत होते. त्यांच्या वेबसाइटनुसार, जो एक अभिनेता तर होतेच, पण त्याशिवाय परवानाधारक फाल्कनर, पायलट, ओपन-वॉटर डायव्हर, सर्फर, बॉक्सर आणि प्रशिक्षित नेमबाज होते.
‘स्कूल ऑफ रॉक’ फेम अभिनेता केव्हिन क्लार्कचे अपघातात निधन, हॉलिवूड इंडस्ट्रीत शोककळा




