China refuses to disclose early cases of corona infection to WHO
कोरोना ग्लोबल

लसीकरणाची गती वाढवावी, अन्यथा डेल्टा व्हेरिएंट अधिक जीवघेणा ठरु शकतो – WHO

नवी दिल्ली : जगभरातल्या सर्व देशांनी कोरोना लसीकरणाची गती वाढवावी, अन्यथा डेल्टा व्हेरिएंट अधिक जीवघेणा ठरु शकतो असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. या वर्षाच्या सप्टेंबर अखेर सर्वच देशांनी आपल्या किमान 10 टक्के नागरिकांना लस मिळेल यावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. तसेच या वर्षाच्या अखेरपर्यंत जगभरातल्या 40 टक्के लोकांना लस मिळण्याची आवश्यकता आहे, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

येत्या 2022 सालापर्यंत जगभरातील 70 टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली असून डेल्टा व्हेरिएंटवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवे, अन्यथा जगभरातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केलं आहे.

डेल्टा व्हेरिएंट या कोरोनाच्या प्रकाराचा जगभरातील 132 देशांत प्रसार झाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घेऊन यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करायला हवा. डेल्टा व्हेरिएंटवर नियंत्रण ठेवण्यासाठी लसीकरणासोबतच फेस मास्क, सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छता आणि गर्दीचे ठिकाण टाळणे या गोष्टींचे पालन करण्याचे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की गेल्या आठवड्यात जवळजवळ 4 दशलक्ष कोरोना प्रकरणे नोंदवली गेली आहेत, यापैकी बरेचसे रुग्ण जलद पसरणाऱ्या डेल्टा व्हेरिएंटद्वारे संसर्गित झाले आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत