26-year-old doctor dies of corona, dies within hours of being positive

रुग्णांवर दुपारपर्यंत उपचार केले, त्यानंतर काही तासातच झाला डॉक्टरांचा मृत्यू

कोरोना देश

दिल्ली : डॉ. अनस मुजाहीद (26) यांचा कोरोनाने मृत्यू झाला. ते दिल्लीतील गुरू तेग बहादूर रुग्णालयात कार्यरत होते. कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट मिळाल्यानंतर काही तासातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या काही तासांच्या आता झालेल्या आकस्मिक मृत्यूमुळे रुग्णालयातील त्यांच्या सहकाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली.

डॉ. अनस मुजाहीद यांनी जानेवारी महिन्यात एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर इंटर्नशिप केली. त्यानंतर ते गुरू तेग बहादूर रुग्णालयात काम करू लागले. दिल्लीतील भागिरथी विहार येथे राहणारे डॉ. अनस शनिवारी नेहमीप्रमाणे रुग्णालयात आले आणि त्यांनी आपले काम सुरु केले. शनिवारी दुपारपर्यंत ते रुग्णांची सेवा करत होते. परंतु त्यांना त्रास होत असल्याने रात्री ८ च्या सुमारास त्यांची रॅपिड कोरोना चाचणी केली. त्यात त्यांना करोना झाल्याचं निष्पन्न झालं. त्यांना त्रास होत असल्याने त्यांच्यावर तात्काळ उपचार देखील सुरु करण्यात आले. मात्र मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा रविवारी रात्री ३ वाजता मृत्यू झाला.

डॉ. अनस यांचे सहकारी डॉ. सोहिल यांनी सांगितलं कि, “डॉ. अनस मुजाहीद यांना ताप आला होता, त्यामुळे त्यांची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली. त्यानंतर क्लिनिकमध्ये बसलेले असताना ते अचानक कोसळले. आम्ही त्यांना तात्काळ अतिदक्षता विभागात दाखल केलं. तेव्हा ते उपचाराला प्रतिसाद देत नव्हते. त्यामुळे त्यांचं सीटी स्कॅन केलं. त्यात त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्याचं दिसून आलं. त्यानंतर त्यांना तात्काळ न्यूरोलॉजिकल विभागात हलवलं. मात्र तिथे त्यांचा मृत्यू झाला.” काही तासांच्या आतच सर्व घटना घडल्यामुळे डॉ. अनस यांच्या सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत