Army chopper crashes
देश

ब्रेकिंग! अरुणाचल प्रदेशातील सियांग जिल्ह्यात हेलिकॉप्टर कोसळले, मदत कार्यासाठी बचावपथक रवाना

अरुणाचल प्रदेश : अरुणाचल प्रदेशातील सियांग जिल्ह्यातील एका गावात हेलिकॉप्टर कोसळले आहे. शुक्रवारी हा मोठा अपघात झाला. अरुणाचल प्रदेशातील सियांग जिल्ह्यातील सिंगिंग गावाजवळ आर्मी एव्हिएशन ALH हेलिकॉप्टर कोसळले आहे. हे ठिकाण टुटिंग मुख्यालयापासून २५ किलोमीटर अंतरावर आहे. मदत कार्यासाठी बचावपथक पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

याअगोदर मंगळवारी केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश होऊन त्यातील सर्व ७ जणांचा मृत्यू झाला होता. केदारनाथपासून दोन किमी अंतरावर असलेल्या गरुडचट्टीमध्ये हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर गुप्तकाशीहून केदारनाथला निघाले होते आणि खराब हवामानामुळे या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत