RTGS service will be interrupted for 14 hours from midnight on SaturdayRTGS service will be interrupted for 14 hours from midnight on Saturday

मोठी बातमी : RTGS सेवा ‘या’ दिवशी 14 तासासाठी राहणार खंडित

अर्थकारण देश

नवी दिल्ली : RTGS (रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट) सेवा शनिवारी मध्यरात्रीपासून ते रविवारी (18 एप्रिल) दुपारी 2 पर्यंत म्हणजे 14 तास खंडित राहणार आहे. NEFT सेवा (राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर) सुरळीत सुरु राहील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) याबाबत माहिती दिली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

आरबीआयने निवेदनात म्हटले आहे की, 18 एप्रिल 2021 रोजी आरटीजीएस सेवा 00:00 वाजेपासून ते 14.00 वाजेपर्यंत उपलब्ध होणार नाही. 17 एप्रिल 2021 रोजी व्यवसायाची वेळ संपुष्टात आल्यानंतर RTGS सिस्टमची क्षमता सुधारण्यासाठी आणि आपत्ती पुनर्प्राप्तीची वेळ सुलभ करण्यासाठी RTGS ला तांत्रिकदृष्ट्या श्रेणीसुधारित केले जाईल.

त्यानुसार सदस्य बँका त्यांच्या पेमेंट ऑपरेशन्स योजनांबद्दल ग्राहकांना माहिती देऊ शकतात. देशात मागील वर्षी 14 डिसेंबरपासून आरटीजीएस सुविधा 24 तास उपलब्ध आहे. यासह, ही सुविधा 24 तास कार्यरत असणार्‍या काही देशांमध्ये भारत समाविष्ट आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत