Three arrested in bogus ITC case for Rs 218 crore fake bills
अर्थकारण क्राईम महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्र राज्य जीएसटी पथकाची कारवाई, २१८ कोटी रुपयांच्या बनावट बिलांवरून बोगस आयटीसी दाव्याप्रकरणी तिघांना अटक

मुंबई, दि. 29 : महाराष्ट्र जीएसटीच्या सर्वसमावेशक विश्लेषणात्मक साधनांद्वारे आणि जीएसटी पोर्टलवर उपलब्ध माहितीद्वारे नवीन नोंदणीकृत करदात्यांच्या गटाचे विश्लेषण करताना विभागाला काही करदात्यांचे 200 कोटींपेक्षा जास्त रकमेचे संशयास्पद व्यावसायिक व्यवहार लक्षात आले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

२५ एप्रिल 2022 रोजी महाराष्ट्र राज्य जीएसटीच्या पथकांद्वारे उल्हासनगर येथे असलेल्या मे. एम्पायर एंटरप्राइजेस, M/S. शंकर एंटरप्रायझेस आणि M/S. M M Enterprises. या करदात्यांच्या विविध व्यावसायिक ठिकाणी तपासणी भेटी करण्यात आल्या. या सर्व करदात्यांनी घरोघरी गोळा केलेली वीज बिले यासारखी बनावट कागदपत्रे देऊन आणि जागा मालकांची परवानगी न घेताच, त्यांना अंधारात ठेवून भाडे-परवाना करार करून जीएसटी नोंदणी मिळवली असल्याचे तपासणी भेटीच्या वेळी आढळून आले.

या करदात्यांनी 218.26 कोटी रू किंमतीच्या करपात्र मूल्याच्या बोगस पावत्या इतर करदात्यांना कोणत्याही वस्तू किंवा सेवांचा पुरवठा न करता त्यांनी त्यांच्या लाभार्थींना 39.28 कोटींचा आयटीसी दावा केला असल्याचे आढळले. याप्रकरणी 29 एप्रिल 2022 रोजी महानगर दंडाधिकारी यांनी मे. शंकर एंटरप्रायझेसचे मालक शंकर आप्पा जाधव, (वय 37), मे. एम्पायर एंटरप्रायझेसचे मालक बापू वसंत वाघमारे, (वय 36), आणि दस्तऐवज संकलन एजंट आदेश मधुकर गायकवाड, (वय 36) यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

या तपासाची मोहीम श्री.राहुल द्विवेदी (आयएएस), राज्य कर सहआयुक्त, अन्वेषण-ए आणि श्री. संजय व्ही. सावंत, उपअभियंता. राज्य कर आयुक्त (DC-E-002) राज्य कर सहायक आयुक्त, श्री. गिरीश पी. पाटील, श्री. राहुल एच. मोहोकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य कर विभागाचे इतर सहायक आयुक्त व राज्य कर निरीक्षक यांनी राबवली.

या आर्थिक वर्षात राज्य जीएसटी विभागाने आत्तापर्यंत आठ जणांना अटक केली आहे. याव्दारे थकबाकीदार आणि करचोरी करणा-यांना, दोषींना पकडण्यात कोणतीही कसर सोडणार नसल्याचा कडक इशारा विभागाने दिला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत