Revenue Minister appreciates Somnath Gite de-addiction work

डॉ. सोमनाथ गिते यांना ‘राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवादुत पुरस्कार २०२२’ प्रदान

अहमदनगर महाराष्ट्र व्यसनमुक्ती

संगमनेर : मागील १०-१२ वर्षांपासून व्यसनमुक्ती विषयावर सातत्याने लेखन करणारे डॉ. सोमनाथ गिते यांना २०२२ चा ‘व्यसनमुक्ती सेवादुत पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. समुपदेशन, वर्तमानपत्रं, मासिकं, सोशल मीडिया आदी माध्यमांतून जनजागृती करत समाजात व्यसनमुक्ती चळवळीचे कार्य गिते यांनी केले आहे. या कार्याची दखल घेत शांताई प्रतिष्ठान संचलित स्वर्ग व्यसनमुक्ती केंद्राच्या तसेच सिद्धिविनायक हाॅस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा ‘राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवादुत पुरस्कार २०२२’ त्यांना प्रदान करण्यात आला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

गंगाखेड (परभणी) तालुक्यातील राणीसावरगाव येथे झालेल्या एकदिवसीय राज्यस्तरीय व्यसनमुक्ती शिबीरात समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त एस. के. मिनगिरे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त एस.के.मिनगिरे तर स्वागताध्यक्ष डॉ. गजानन रेवणवार, डॉ. शुभांगी ग.रेवणवार व प्रकल्प समन्वयक विठ्ठल आचार्य हे होते. सुत्रसंचालन प्रा. शिवशंकर डोईजड यांनी केले, प्रभाकर महाराज कांबळे यांनी आभार मानले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून व्यसनमुक्ती परिषदेचे प्रदेश सरचिटणीस व सामाजिक न्याय विभागाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार विजेते प्रा. अजिनाथ शेरकर, सहायक पोलिस निरीक्षक विक्रम हराळे, डॉ. व्यंकटेश दुब्बे, डॉ. गोविंद शिंदे, प्रसिद्ध व्याख्याते प्रा. सुभाष ढगे चाटोरीकर, सरपंच सौ. कल्पनाताई जाधव, चेअरमन नागेश जाधव, उपसरपंच गफार शेठ, जेष्ठ पत्रकार प्रकाश गळाकाटु आदी मान्यवर उपस्थित होते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत