Wrestler Died Of Heart Attacks During Wrestling Practice
कोल्हापूर महाराष्ट्र सोलापूर

कुस्तीच्या सरावानंतर 23 वर्षाच्या पैलवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

पंढरपूर : तालमीत कुस्तीचा सराव करत असताना २३ वर्षाच्या पैलवानाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पंढरपूरच्या वाखरी येथील मारूती सुरवसे हा तरुण कोल्हापुरातील एका तालमीत सराव करत होता, त्यावेळी ही घटना घडली. त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

गेल्या काही वर्षांपासून सुरवसे हा कोल्हापुरातील तालमीत कुस्तीचा सराव करत होता. दरम्यान, रात्री तालमीत कुस्तीचा सराव करून झाल्यानंतर अंघोळ करत असताना अचानक छातीत दुखू लागल्यानंतर त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मयत मारूतीचे वडील वाखरीत शेती करतात. मारूतीला लहानपणापासूनच कुस्तीची आवड होती. कुस्तीमध्ये करियर करण्यासाठी तो कोल्हापूर येथील तालमीत कुस्तीच्या सरावासाठी राहत होता. दरम्यान, या घटनेमुळे तरुणांमध्ये वाढणारा हृदयविकाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत