पुणे : १३ डिसेंबर रोजी इंग्लंडमधून परतलेल्या पुण्यातील एका व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली आहे. त्या व्यक्तीची प्रकृती सध्या स्थिर अशून, कोरोनाच्या विषाणूची स्ट्रेन तपासण्यासाठी त्यांचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (NIV) पाठविण्यात येणार आहेत.
१३ डिसेंबर रोजी ही व्यक्ती पुण्यात परतली होती. १७ तारखेला त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्या तरुणाला कोरोनाच्या नव्या ‘स्ट्रेन’ची लागण झाली आहे की नाही, हे तपासण्यासाठी ‘जेनेटिक सिक्वेन्सिंग’ चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.