mosquito

अरे वाह! आता डास करणार आपला मलेरियापासून बचाव, शास्त्रज्ञांचा नवीन शोध

ग्लोबल

वॉशिंग्टन : डास चावल्यामुळे मलेरिया होतो, आतापर्यंत आपल्याला हे माहिती आहे. ते टाळण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात, परंतु आता परिस्थिती बदलणार आहे. वैज्ञानिक आता डासांच्या आतड्यात असे काही बदल करण्याचा प्रयत्न करीत आहेत, जेणेकरून ते आपल्या पुढच्या पिढीमार्फत मलेरियाविरोधी जनुक पसरवू शकेल. म्हणजे आता डासच आपला मलेरियापासून बचाव करतील. यामुळे मलेरियाचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यात मदत होईल. ई-लाइफ नावाच्या जर्नलमध्ये यासंदर्भातील प्राथमिक अभ्यास प्रकाशित करण्यात आला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

या नवीन अभ्यासात मलेरिया पसरण्याची डासांची क्षमता कमी करण्यासाठी सीआरआयएसपीआर-सीएएस 9 जनुकीय संपादन तंत्राद्वारे त्याचे जीन सुधारित केले गेले आणि त्यांत बदल करण्यात आला. पुढील अभ्यास या दृष्टिकोनाचे समर्थन करत असल्यास मलेरिया आणि त्यातून होणारे मृत्यू कमी करण्यात मोठे यश मिळू शकेल.

खरं तर, डासांमध्ये जंतुनाशकांविरोधात रोगप्रतिकार शक्ती वाढली आहे आणि आता मलेरिया परजीवीवर मलेरियाविरोधी औषधांचा प्रभाव देखील कमी झाला आहे, त्यामुळे उद्भवणारा पुढील धोका लक्षात घेता डासांचा सामना करण्यासाठी नवीन मार्ग शोधणे ही तातडीची गरज बनली आहे. या दिशेने जनुक-बदल त्याचा प्रादुर्भाव कमी करण्यात प्रभावी ठरू शकते.

जीन ड्राइव्ह एक प्रभावी शस्त्र :

लंडनमधील इम्पीरियल कॉलेजचे संशोधक आणि अभ्यासाचे पहिले लेखक एस्ट्रिड होर्मन म्हणतात की मलेरियावर नियंत्रण ठेवण्यासाठी जीन ड्राईव्ह एक प्रभावी शस्त्र सिद्ध होऊ शकते. होरमन आणि त्यांच्या सहका्यांनी मलेरिया पसरविणारा डास एनोफिलिस गैंबैई च्या जनुकमध्ये बदल केले. त्यांनी सीआरआयएसपीआर-सीएएस 9 तंत्राद्वारे मलेरियाविरोधी प्रथिने एन्कोड करू शकणारे एक जीन त्यात प्रविष्ट केले. हे प्रोटीन डास चावल्यानंतर शरीरात प्रवेश करते.

मलेरिया नियंत्रण होईल सोपे :

डासांच्या पोटात मलेरिया परजीवी कशी वाढतात याचीही त्यांनी तपासणी केली. हा प्रयोग जनुक सुधारणेच्या या पद्धतीने यशस्वी जीन ड्राइव्ह (सुधारित जीनची वाहतूक पुढील पिढीकडे नेणे) यशस्वीरीत्या पार पाडला जाऊ शकतो असा प्राथमिक पुरावा त्यांच्या प्रयोगांनी दिला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत