Lic Housing Finance Introduce Lowest Home Loan Rate For Limited Period
अर्थकारण देश

गृहकर्ज घेताय? एलआयसी हाउसिंग फायनान्सकडून व्याजदरात मोठी कपात, जाणून घ्या…

मुंबई : एलआयसी हाउसिंग फायनान्सने गृहकर्ज दरात कपात करण्याबाबत घोषणा केली आहे. ५० लाखांपर्यंतच्या कर्जावरील व्याजदर ६.६६ टक्के करण्यात आला आहे. येत्या ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत हा विशेष गृहकर्ज दर लागू राहील, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. गृहकर्जाचा हा सर्वात कमी व्याजदर असल्याचं कंपनीने म्हटलं आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

‘एलआयसी हाउसिंग फायनान्स’चा ६.६६ टक्के गृहकर्ज दर हा जास्तीत जास्त ३० वर्ष कालावधीतील गृहकर्ज श्रेणीतील सर्वात कमी दर आहे. दरम्यान, या कर्जासाठी ग्राहक ऍपवरून देखील अर्ज करू शकतात. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून कर्ज ऑनलाइनच मंजूर केले जाते. तसेच अर्जाची प्रक्रिया कुठपर्यंत आली, तिचे स्टेटस काय आहे, हे देखील ग्राहकांना ऑनलाइन कळू शकेल. यासाठी कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही, असे कंपनीने म्हटलं आहे.

गृह कर्जाचा हा विशेष व्याजदर प्राप्त करण्यासाठी ग्राहकाचे सिबिल रेकॉर्ड ग्राह्य धरले जाणार आहे. सिबिलच्या आधारे कर्जदाराची पत क्षमता किती आहे त्यावरून हा विशेष व्याजदर दिला जाईल, असे कंपनीने म्हटले आहे. एलआयसी हाउसिंग फायनान्सने शुक्रवारी याबाबत प्रसिद्धी पत्रक जारी केलं आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत