पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमधील बागडोगरा येथे आपत्कालीन लँडिंग दरम्यान भारतीय हवाई दलाचे AN-32 वाहतूक विमान कोसळले. हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानातील सर्व क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत. हवाई दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरु आहे.
आजच, हरियाणामध्ये हवाई दलाचे एक जॅग्वार लढाऊ विमान कोसळले. या अपघातात, पायलट पॅराशूटच्या मदतीने वेळेवर सुरक्षितपणे बाहेर पडला. पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, वैमानिकाने हुशारी दाखवली आणि गर्दीच्या क्षेत्रापासून दूर विमान कोसळले, त्यामुळे जमिनीवर कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाली नाही. हा अपघात मोरनी हिल्सजवळ घडला. वैमानिक पूर्णपणे सुरक्षित आहेत. पंचकुलाचे पोलिस उपायुक्त हिमाद्री कौशिक यांनीही सांगितले की, विमान रायपूर राणी परिसरात कोसळले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान अंबाला एअरबेसवरून नियमित प्रशिक्षण उड्डाणासाठी निघाले होते. मात्र, एकाच दिवसात हवाई दलाच्या विमान अपघातांच्या दोन घटना घडल्या आहेत. भारतीय हवाई दलाने दोन्ही अपघातांचा तपास सुरू केला आहे.
A Jaguar aircraft of the IAF crashed at Ambala, during a routine training sortie today, after encountering system malfunction. The pilot maneuvered the aircraft away from any habitation on ground, before ejecting safely.
An inquiry has been ordered by the IAF, to ascertain the…
— Indian Air Force (@IAF_MCC) March 7, 2025