Called for an interview and gang-raped the girl
क्राईम देश

संतापजनक! प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी महिलेचे अपहरण करून सामूहिक बलात्कार

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. एका महिलेचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. पीडित महिला आणि आरोपींमध्ये पूर्ववैमनस्य होतं, त्यातूनच ही घटना घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून चौकशी सुरू आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचे लग्न झाले असून तिला एक मूल आहे. मध्यंतरी अनेक महिने तिच्या शेजारी राहणारा एक तरुण तिचा पाठलाग करत होता. त्याने नोव्हेंबरमध्ये आत्महत्या केली. त्या तरुणाच्या कुटुंबीयांनी त्याच्या आत्महत्येसाठी महिलेला जबाबदार धरले होते. यासंदर्भात इंडिया टुडेने वृत्त दिले आहे. दिल्लीच्या विवेक विहार परिसरात अपहरण करून महिलेवर सामूहिक बलात्कार केला. आरोपींनी बलात्कार केल्यानंतर महिलेचे केस कापले, तिला चपलांचा हार घालून रस्त्यावर फिरायला लावले.

दरम्यान, या घटनेची माहिती महिलेच्या लहान बहिणीने पोलिसांना दिली. महिलेच्या तक्रारीवरून सामूहिक बलात्काराची तक्रार दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पीडितेला सर्व शक्य मदत आणि समुपदेशन केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

दिल्ली महिला आयोगाने (DCW) या प्रकरणाची दखल घेतली आहे. अवैध दारू विक्रेत्यांनी महिलेचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला, असे आयोग प्रमुख स्वाती मालीवाल यांनी सांगितले. आयोग दिल्ली पोलिसांना याप्रकरणी नोटीस जारी करणार आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत