Lalu Prasad Yadav's health deteriorated, doctors expressed concern

लालू प्रसाद यादव यांच्या शरीराची हालचाल बंद, प्रकृती चिंताजनक

देश

नवी दिल्ली : राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची प्रकृती चिंताजनक आहे. बुधवारी रात्री उशिरा त्यांना पाटण्याहून दिल्लीच्या एम्स रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु, त्यांची प्रकृती नाजूक आहे. त्यांचा मुलगा तेजस्वी यादव यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

तेजस्वी यादव यांनी सांगितले कि, “लालू प्रसाद यादव यांच्या आरोग्याची संपूर्ण तपासणी केली जाईल. त्यानंतर उपचार सुरू केले जातील. सद्यस्थितीत त्यांच्या शरीराची कोणतीही हालचाल होत नाही.” पाय घसरुन पडल्यामुळे लालूंना 3 ठिकाणी फ्रॅक्चर झाले आहे. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. तेजस्वी म्हणाले की, “वडिलांना वेगवेगळी औषधी दिली जात आहे. आता ज्या समस्या आहेत, त्या दूर करण्यासाठी देण्यात येणाऱ्या औषधींचा दुष्परिणाम हार्ट किंवा किडनीवर पडू नये यासाठी त्यांना एम्समध्ये आणण्यात आले आहे. येथे त्यांची संपूर्ण तपासणी केली जाईल.”

तेजस्वी यांनी सांगितले की, “लालूंना सिंगापूरला हलवण्याचा निर्णय डॉक्टर घेतील. त्यांच्या लिव्हर व किडनी प्रत्यारोपणाची चर्चा सुरू आहे. त्यांच्या हार्टमध्येही वेदना होत्या. 2-3 दिवस तापही होता. औषधींच्या ओव्हरडोसमुळे त्यांना अस्वस्थ वाटत होते.”

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत