7 boys gang raped 10 year old girl in gurugram six accused are minors

धक्कादायक! 10 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार, 6 आरोपी 10 ते 12 वयाचे, सोशल मीडियावर व्हिडिओ बघितल्यावर झाला खुलासा

क्राईम देश

हरियाणा : हरियाणाच्या रेवाडी येथे 24 मे रोजी काही मुले मैदानात खेळत होते, त्यानंतर खेळता-खेळता ते जवळच्या शाळेच्या इमारतीत गेली. तेथे 10 वर्षाच्या मुलीवर 7 मुलांनी सामूहिक बलात्कार केला. परंतु, ही घटना एका आठवड्यानंतर उघडकीस आली, जेव्हा पीडित मुलीच्या शेजाऱ्यांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर बघितला. त्यानंतर या व्यक्तीने तात्काळ याबाबत मुलीच्या कुटुंबियांना माहिती दिली, त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

9 जून रोजी मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे जाऊन गुन्हा दाखल केला. रेवाडी डीएसपी (मुख्यालय) हंसराज यांनी सांगितले की, महिला पोलिस ठाण्यात आयपीसी कलम 376 डी, 354 सी, 506, पॉक्सो अ‍ॅक्ट, आयटी अ‍ॅक्ट आणि एससी / एसटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, या सात आरोपींपैकी फक्त एक वयस्क असून 18 वर्षांचा आहे, तर उर्वरित 6 आरोपी हे 10 ते 12 वर्षांच्या दरम्यानचे आहेत. व्हिडिओच्या आधारे मुलीच्या शेजाऱ्यांनी या सर्व आरोपींची ओळख पटविली आहे. पोलिसांनी या सर्व आरोपींना ताब्यात घेतले आहे.

विकृतीचा कळस! महिलेने पतीची हत्या केली, त्याचा प्रायव्हेट पार्ट कापून पॅनमध्ये शिजवला…

पोलिसांनी सांगितले की, मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून यामध्ये मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची पुष्टी झाली आहे. या आरोपींपैकी ६ अल्पवयीन आरोपींना बाल न्याय मंडळासमोर हजर केले, त्यानंतर सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. तर 18 वर्षांच्या आरोपीला कोर्टासमोर हजर केल्यानंतर त्याला जिल्हा कारागृहात पाठविण्यात आले. पोलिस व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या अन्य अल्पवयीन मुलांचा शोध घेत आहेत, तसेच हा व्हिडिओ शेयर करणाऱ्याचा देखील शोध घेत आहेत. डीएसपी म्हणाले की अशा प्रकारचा व्हिडिओ शेयर करणे देखील गुन्हा आहे.

पीडित मुलगी आणि आरोपी मुलांची कुटुंबे एकमेकांना ओळखतात. ते सर्व रेवाडीतील खेड्यात शेजारीच राहतात. जवळच एक शाळेची इमारत आहे, जेथे मुले खेळत होती. कोरोनामुळे कोणतेही वर्ग चालू नव्हते, शाळा मोकळी होती. पोलिसांनी सांगितले की यापैकी कोणत्याही मुलाने या गुन्ह्याबाबत चर्चा केली नाही. तसेच पीडित मुलीने देखील तिच्या कुटुंबियांना याबाबत माहिती दिली नाही. 8 जून रोजी जेव्हा मुलीच्या शेजाऱ्यांनी व्हिडिओ पाहिला, तेव्हा त्यांनी मुलीच्या कुटुंबियांना याची माहिती दिली आणि ही घटना उघडकीस आली.

महिलेने तिच्या 5 मुलींसह रेल्वेसमोर उडी मारून केली आत्महत्या, कारण…

भयंकर! भाजप नेत्याच्या मुलीवर सामुहिक बलात्कार, मुलीला मारहाण करून तिचा डोळा काढला आणि…

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत