Minor Girl Of BJP Leader Tortured Raped And Murdered In Ranchi

भयंकर! भाजप नेत्याच्या मुलीवर सामुहिक बलात्कार, मुलीला मारहाण करून तिचा डोळा काढला आणि…

क्राईम

रांची : झारखंडच्या पलामू जिल्ह्यात भाजप नेत्याच्या मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पलामू जिल्ह्यातील ललिमती जंगलात बुधवारी या 16 वर्षाच्या मुलीचा मृतदेह झाडाला लटकलेला आढळला. या अल्पवयीन मुलीचा उजवा डोळा काढण्यात आला नंतर तिनं आत्महत्या केल्याचं भासवण्यासाठी तिचा मृतदेह झाडाला टांगला. पोलीसांनी प्रदीपकुमार सिंह धानुक नावाच्या एका आरोपीला अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरु आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, 7 जून रोजी पीडीत मुलगी सकाळी 10 वाजता घराबाहेर पडली होती आणि त्यानंतर ती बेपत्ता झाली. मुलगी परतली नाही म्हणून आई वडीलांनी तिची शोधाशोध केली, पण तिचा काहीच पत्ता लागला नाही. त्यानंतर भाजपचे स्थानिक नेता असलेल्या वडीलांनी पांकी पोलीसात तक्रार दाखल केली. पोलीसांनी मुलीचा शोध सुरु केला. दरम्यान, स्थानिकांना ललिमती जंगलात बुधवारी (9 जून) या मुलीचा मृतदेह झाडाला लटकलेला आढळला. कुटुंबियांनी ओळख पटवून ही त्यांचीच मुलगी असल्याची खात्री केली.

पोलिसांना घटनास्थळावरुन एक मोबाईल हाती लागला आहे, फोनच्या कॉल रेकॉर्ड्सवरून प्रदीप कुमारसिंग धानुक (वय 23) याला अटक करण्यात आली आहे. प्रदीप कुमारसिंग धानुक हा एक विवाहित पुरुष आहे. खुनामध्ये एकाधिक लोकांचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. गुन्हेगारांनी मुलीला ठार मारण्यापूर्वीच तिला निर्दयीपणे मारहाण केली आणि तिचा उजवा डोळा काढला. मुलीच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की मुलीची हत्या करण्यापूर्वी तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. तथापि, अद्याप याची पुष्टी होणे बाकी आहे.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी मेदिनीनगर येथील मेदिनी राय मेडिकल कॉलेजमध्ये पाठविला. पोस्टमार्टम अहवाल येणे अद्याप बाकी आहे. त्यानंतर हे बलात्काराचे प्रकरण आहे की नाही हे निश्चित केले जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. स्थानिक भाजपा नेत्याला चार मुली आणि एक मुलगा आहे. या पाच मुलांमध्ये पीडित मुलगी सर्वात मोठी होती. तिच्या पार्थिवावर बुधवारी सायंकाळी स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, पोलिस तपासात मुलीचे कुटुंब समाधानी नसेल तर पक्ष स्वतंत्र चौकशीची मागणी करेल, असे आश्वासन झारखंड भाजपाचे प्रवक्ते प्रतुल शाहदेव यांनी दिले आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत