15 days special casual leave for govt employees whose parents or dependents test covid positive

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, पालकांना कोरोनाची लागण झाल्यास मिळणार SCL

देश

नवी दिल्ली : कोरोना विषाणूची दुसरी लाट सध्या देशात सुरु आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कर्मचार्‍यांना नवीन सुविधा दिल्या आहेत. जर एखाद्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्याच्या पालकांना किंवा कुटुंबातील सदस्याला कोरोनाची लागण झाल्याचे आढळले, तर तो कर्मचारी 15 दिवसांसाठी खास कॅज्युअल रजा (SCL) घेण्यास पात्र ठरेल, असा आदेश मंत्रालयाने जारी केला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मंत्रालयाने सरकारी कर्मचार्‍यांना भेडसावणाऱ्या अडचणीही लक्षात घेतल्या आहेत. यासाठी कोरोनादरम्यान उपचार, रुग्णालयात दाखल करणे, विलगीकरण इत्यादी संदर्भातील विविध प्रश्नांसाठी सविस्तर आदेश देण्यात आले आहेत.

  1. जर कुटूंबातील कोणत्याही सदस्याला / पालकांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता असेल आणि 15 दिवसांची ही एससीएल संपली असेल, तर अशा परिस्थितीत सरकारी कर्मचाऱ्याला त्याच्या नातेवाईकांना रुग्णालयातून सोडण्यात येईपर्यंत अन्य कोणतीही सुट्टी दिली जाऊ शकते.
  2. जर एखादा सरकारी कर्मचारी संक्रमित झाला असेल आणि तो घरी किंवा इतर ठिकाणी विलगीकरणात असेल तर त्याला 20 दिवसांपर्यंतची सुट्टी दिली जाऊ शकते.
  3. जर एखादा सरकारी कर्मचारी संक्रमित झाला असेल आणि तो घरात विलगीकरणात असेल आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले तर त्याला / तिला संक्रमित झाल्यापासून 20 दिवसांपर्यंत रजा / एससीएल / अर्जित रजा मिळू शकेल.
  4. कोविडची लागण झाल्यावर 20 व्या दिवसानंतरही जर एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याला रुग्णालयात ठेवावे लागले तर त्याला कागदोपत्री पुराव्यांच्या आधारे रूपांतरित रजा मिळतील.
  5. सरकारी कर्मचार्‍याचे आई-वडील किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याला कोविडची लागण झाल्यास त्याला 15 दिवसांची खास कॅज्युअल रजा मिळेल.
  6. सरकारी कर्मचारी कोरोना संक्रमित व्यक्तीच्या थेट संपर्कात आला आणि तो घरी विलगीकरणात असेल तर त्याला सात दिवस ‘वर्क फ्रॉम होम’ समजले जाईल.
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत