world hunger day 2021 history importance significance and theme
ग्लोबल देश

World Hunger Day : जागतिक भूक दिवसाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी, भूक निर्देशांकात भारताची स्थिती काय? जाणून घ्या..

World Hunger Day 2021 : कोरोना काळात सध्या बर्‍याच राज्यांमध्ये लॉकडाऊन आहे, त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या गरीब लोकांना सध्या दोन वेळच्या जेवणाची चिंता सतावत असते. तथापि, अनेक सामाजिक संस्था, सरकारी संस्था त्यांची भूक भागविण्याचा प्रयत्न करीत आहेत. असे असले तरीही आकडेवारीवरून दिसून येते की कोरोनाच्या खूप अगोदरपासून देशात असे लाखो लोक आहेत जे दररोज रात्री उपाशीपोटी झोपतात. विशेष म्हणजे, अशा परिस्थितीतही आपल्या देशात खूप मोठ्या प्रमाणात अन्नाची नासाडी होते. आज जागतिक भूक दिन आहे, चला या दिवसाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊ..

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

जागतिक भूक दिनाची सुरुवात कशी झाली?

जागतिक भूक दिवस दरवर्षी 28 मे रोजी जागतिक स्तरावर साजरा केला जातो. हा दिवस 2011 मध्ये सुरू झाला.

हा दिवस साजरा करण्याचा उद्देश :

हा दिवस साजरा करण्याचा उद्देश म्हणजे जगभरात उपासमारीने पीडित असलेल्या लोकांबद्दल जागरूकता वाढविणे. भारतातील प्रत्येक व्यक्तीला पुरेसे अन्न मिळत नाही यात शंका नाही. हे खरे आहे की भूक ही एक जागतिक समस्या आहे, परंतु बऱ्याच देशांनी मजबूत आणि सुसंघटित धोरणे बनवून यातून सुटका मिळवली आहे, आपण याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. भारतालाही या दिशेने कार्य करण्याची गरज आहे.

जागतिक भूक दिन 2021 ची थीम :

वर्ल्ड हंगर डे 2021 ची थीम ‘एक्सेस एंड्स हंगर’ आहे.

भूक निर्देशांकात भारताची स्थिती :

  1. 107 देशांच्या जागतिक भूक निर्देशांकात भारताचा 94 वा क्रमांक आहे.
  2. 27.2 च्या स्कोरसह भारताला गंभीर प्रकारात स्थान देण्यात आले आहे.
  3. अहवालात देशातील 14% लोक कुपोषित असल्याची नोंद आहे
  4. 5 वर्षाखालील मुलांचा मृत्यू दर 3.7% आहे.
  5. 37.4% मुले कुपोषणामुळे वाढत नाहीत.
  6. 38% मुलांचा विकास शाळेत जाण्यापूर्वीच थांबला.
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत