The young man killed in pune
क्राईम पुणे महाराष्ट्र

पुण्यात तरुणावर दिवसाढवळ्या चाकूहल्ला, कारण…

पुणे : बहिणीला ‘प्रपोज’ करणाऱ्या तरुणाला तिच्या भावाने समजावून सांगितले, मात्र, त्यामुळे राग आल्याने त्या तरुणाने तरुणीच्या भावावर चाकूने वार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोंढवा पोलिस ठाण्यापासून अवघ्या पाचशे मीटर अंतरावर दिवसाढवळ्या ही घटना घडली आहे. हा प्रकार कोंढवा खुर्द येथील शितल पेट्रोल पंप चौकात घडला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीच्या बहिणीला सात ते आठ महिन्यांपूर्वी रस्त्यात अडवून ‘प्रपोज’ केले होते. तेव्हा तरुणीचा भाऊ या आरोपीला भेटला होता आणि त्याला ‘माझ्या बहिणीला त्रास देऊ नको’ असे सांगितले होते. या गोष्टीचा राग आरोपीच्या मनात होता. त्यातूनच आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ केली आणि त्यानंतर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी २२ वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. त्यावरून अस्लम शेख (रा. येवलेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत