Bank transactions will now become more expensive, RBI approves rate hike

बँकांचे व्यवहार आता महाग होणार, दरांमध्ये वाढ करण्यास RBI ची मंजुरी

अर्थकारण देश

मुंबई : बँकांच्या एटीएममधून पैसे काढणं आता महाग होणार आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने सर्व बॅंकांना एटीएम व्यवहारांवर लावण्यात येणाऱ्या किंमतींमध्ये वाढ करण्याची परवानगी दिली आहे. यामध्ये कस्टमर चार्ज आणि गैर बँकिंग चार्जचा देखील समावेश आहे. दोन बँकांमधील इंटरचेंज चार्जमध्येही वाढ करण्यास मंजुरी दिली असल्याने आता फ्री लिमिटपेक्षा जास्त वेळा ट्रान्झॅक्शन केल्यास जास्तीचे पैसे आकारले जाणार आहेत. हा नवा नियम 1 ऑगस्ट 2021 पासून लागू होईल.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सध्या मेट्रो शहरात महिन्याला तीन ट्रान्झॅक्शन आणि इतर शहरात पाच ट्रान्झॅक्शन फ्री देण्यात येत आहेत. त्यापेक्षा अधिक ट्रान्झॅक्शनवर ग्राहकाला 20 रुपये कस्टमर चार्ज लावण्यात येतो. आता हा कस्टमर चार्ज 21 रुपये करण्यात आला आहे. आरबीआयने सर्व बँकांच्या एटीएमवरील आर्थिक ट्रान्झॅक्शनवरील सध्याची इंटरचेंज फी 15 रुपयांवरुन वाढवून ती 17 रुपये केली आहे. त्याचप्रमाणे गैर आर्थिक ट्रान्झॅक्शनसाठी म्हणजे आपल्या खात्यावरील बॅलेन्स चेक करणे किंवा तशा प्रकारची कामं यासाठी असणारी फी 5 रुपयांवरुन 6 रुपये करण्यात आली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत