bahadurgarh over speeding truck women farmer protesters died in accident
देश

हरियाणात भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने शेतकरी आंदोलनकर्त्या महिलांना चिरडलं, 3 महिलांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी

बहादूरगड : नोव्हेंबर २०२० पासून दिल्लीच्या सीमेवर केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात वेगवेगळ्या कारणांनी आत्तापर्यंत जवळपास २०० हून अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यातच आता हरियाणाच्या बहादूरगडमध्ये पुन्हा एक मोठा अपघात झाला आहे. गुरुवारी पहाटे भरधाव ट्रकने तीन आंदोलनकर्त्या महिलांना चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली. ट्रकने चिरडल्यामुळे तीन महिलांचा मृत्यू झाला तर इतर तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सकाळी ६.०० वाजल्याच्या सुमारास झज्जर रोडवर फ्लायओव्हरखाली ही घटना घडली. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या निर्धारीत रोटेशननुसार या महिला आंदोलनानंतर आपल्या घरी निघाल्या होत्या. या महिला रस्त्यावरील डिव्हायडरवर बसून घरी जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहत होत्या. यावेळी एका अनियंत्रित वेगानं येणाऱ्या ट्रकने या महिलांना धडक दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी नागरिकांना रुग्णालयात दाखल केलं.

मिळालेल्या माहितीनुसार, या महिला पंजाबच्या मानसा जिल्ह्याच्या रहिवासी होत्या. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. मृत्युमुखी पडलेल्या दोन महिलांनी जागेवरच प्राण सोडले तर गंभीर जखमी झालेल्या एका महिलेने रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. छिंदर कौर (६० वर्ष), अमरजीत कौर (५८ वर्ष), आणि गुरमेल कौर (६० वर्ष) अशी मृत्युमुखी पडलेल्या महिलांची नावं आहेत. जखमी झालेल्या इतर तीन महिलांची प्रकृती देखील गंभीर आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत