World's first flying bike
गॅझेट्स ग्लोबल तंत्रज्ञान

अरे वाह! जपान पुन्हा एकदा जगाच्या पुढे, उडणारी बाईक विकण्यास केली सुरुवात.. पहा व्हिडिओ..

नवी दिल्ली : सामान्य जीवनात, आपण उडत्या कारचे व्हिडिओ आणि चित्रे पाहून भविष्याबद्दल अंदाज लावत असतो. पण याच दिशेने पुढे जात जपानने फ्लाइंग बाईक सादर केली आहे. काही काळापासून फ्लाइंग बाईक विकसित करणारी जपानी कंपनी ALI Technologies ने XTURISMO लिमिटेड एडिशन या जगातील पहिल्या प्रॅक्टिकल होवर बाइकचा प्रात्यक्षिक उड्डाण व्हिडिओ जारी केला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

ALI Technologies ने 26 ऑक्टोबरपासून XTURISMO लिमिटेड एडिशनसाठी बुकिंग स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी या फ्लाइंग बाईकचे सध्या फक्त 200 युनिट्स बनवणार आहे. तर XTURISMO लिमिटेड एडिशनची किंमत कर आणि विम्यासह 77.7 दशलक्ष येन (अंदाजे रु 5.10 कोटी) आहे. कंपनीने सांगितले की या मर्यादित एडिशनच्या फ्लाइंग बाइकच्या पहिल्या युनिटची डिलिव्हरी पुढील वर्षाच्या पहिल्या सहामाहीत सुरू होईल.

मंगळवारी एका प्रात्यक्षिकादरम्यान, XTURISMO लिमिटेड एडिशन फ्लाइंग बाईक फुजी रेसिंग ट्रॅकवर ग्रँडस्टँडसमोर हवेत उडताना दिसली. XTURISMO फ्लाइंग बाइक किंवा Hoverbike अंतर्गत ज्वलन इंजिनसह इलेक्ट्रिक इंजिनने सुसज्ज आहे. जी पेट्रोलवर चालते. 2025 पर्यंत या फ्लाइंग बाईकचे पूर्णपणे इलेक्ट्रिक व्हर्जन आणण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

XTURISMO फ्लाइंग बाईकचे वजन सुमारे 300 किलो आहे, तर या फ्लाइंग बाइकची लांबी 3.7 मीटर, रुंदी 2.4 मीटर आणि उंची 1.5 मीटर आहे. ज्यामध्ये फक्त एक पायलट बसू शकतो. कंपनीच्या म्हणण्यानुसार, फ्लाइंग बाईकची क्रूझिंग वेळ 30 ते 40 मिनिटांच्या दरम्यान आहे. हॉव्हरबाईकचा कमाल वेग कंपनीने अद्याप उघड केला नसला तरी, प्रात्यक्षिक दरम्यान ती सुमारे 100 किमी प्रतितास या सर्वोच्च गतीवर होती.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत