Alec Baldwin shoots prop gun, killing 1, injuring another on set of 'Rust'
ग्लोबल

चित्रपटाच्या सेटवर प्रॉप गनमधून चुकून गोळी सुटल्याने सिनेमॅटोग्राफरचा मृत्यू, एक जखमी

निर्माते आणि अभिनेता अलेक बाल्डविन (Alec Baldwin) यांच्याकडून ‘रस्ट’ चित्रपटाच्या सेटवर प्रॉप गनमधून चुकून गोळी सुटल्याने एका महिला सिनेमॅटोग्राफरचा मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला आहे. विशेष म्हणजे ही घटना चित्रपटात वापरल्या जाणाऱ्या बंदुकीने घडली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

गुरुवारी न्यू मेक्सिकोमध्ये 42 वर्षीय सिनेमॅटोग्राफर हलिना हचिन्स या सेटवरील दुर्दैवी घटनेत ठार झाल्या. लेखक-दिग्दर्शक जोएल सूझा (48) हे देखील जखमी झाले. सूझा यांना रूग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. हचिन्सला हेलिकॉप्टरने न्यू मेक्सिको युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, जिथे तिला मृत घोषित करण्यात आले, असे शेरीफच्या कार्यालयाने सांगितले.

पोलिसांनी सांगितले की, कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही आणि घटनेचा तपास सुरू आहे. दरम्यान, बाल्डविन, सूझा आणि रस्टचे कार्यकारी निर्माता प्रतिनिधी या प्रकरणावर मौन बाळगून आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत