coronavirus returns in china reported a sudden surge of covid19 cases in guangdong province lockdown imposed in the area
ग्लोबल

चीनमध्ये पुन्हा कोरोनाची लाट! जगात सर्वाधिक लसीकरण होऊनही लॉकडाऊनची वेळ…

चीन : जगात सर्वाधिक लसीकरण झालेल्या चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची लाट आली आहे. चीनमध्ये पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलं असून अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. चिनी सरकारने कठोर निर्बंध लागू केले असून अनेक फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहेत. अनेक भागांमध्ये शाळा बंद करण्यात आल्या आहेत, तर काही ठिकाणी लॉकडाऊन लावण्यात आला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

जगात सर्वाधिक लसीकरण चीनमध्ये झालं आहे. चीनमध्ये 75 टक्के लोकांचं लसीकरण झालं आहे. जवळपास 223 कोटी लोकांचं लसीकरण चीनमध्ये झालं आहे. काल भारतात 100 कोटी लसींच्या डोसचा टप्पा पार झाला असून 30 टक्क्यांच्या जवळपास लसीकरण झालं आहे. परंतु, चीनमध्ये कोरोना पुन्हा वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे.

चीनच्या उत्तर आणि उत्तर पश्चिम भागांमध्ये असलेल्या शहरांमध्ये कोरोना वेगाने पसरत आहे. प्रशासनाने कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. मास टेस्टिंग केली जात आहे. सोबतच टूरिस्ट स्पॉट बंद करण्यात आले आहेत. चीनच्या Lanzhou क्षेत्रामध्ये लोकांना घराच्या बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच आवश्यक कामासाठी घराबाहेर पडत असाल तर कोविड रिपोर्ट निगेटिव्ह असणं आवश्यक आहे. नियमांचं पालन न केल्यास कारवाई केली जात आहे.

 

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत