two year old girl dies after being left in hot car for 7 hours

महिला दोन वर्षाच्या चिमुकलीला कारमध्ये विसरली, तब्बल ७ तासांनी परतली, मात्र…

ग्लोबल

अमेरिका : अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये एक महिला दोन वर्षाच्या चिमुकलीला कारमध्ये विसरल्याची धक्कादायक घटना घडली. या महिलेने मुलीला सीट बेल्ट लावलेला होता. महिलेने कार रस्त्यावर उभी केली आणि ती घरात निघून गेली. सात तासानंतर जेव्हा ती परत आली तेव्हा तिने मुलीला सीटवर बघितले. पण तोपर्यंत गाडीच्या आत या निरागस मुलीचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. ही महिला लहान मुलांना डेकेअरमध्ये घेऊन जाण्याचे काम करायची.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, फ्लोरिडा येथील 43 वर्षीय जुआना पेरेझ-डोमिंगो या महिलेला पोलिसांनी शनिवारी अटक केली. आरोप केला जात आहे की तिने दोन वर्षांच्या मुलीला सात तास कारमध्ये सीट बेल्ट लावून ठेवले, त्यामुळे मुलीचा मृत्यू झाला. अहवालानुसार या दोन वर्षांच्या मुलीचे नाव जोसलीन मारिट्झा मेन्डेज (Joselyn Maritza) आहे. पोलिसांनी सांगितले की आरोपी महिलेवर मुलांना डेकेअरमध्ये नेण्याची जबाबदारी होती. शुक्रवारी आरोपी महिला जोसलीनला तिच्या घरून डेकेअरमध्ये सोडण्यासाठी व्हॅनमधून गेली होती, परंतु सकाळी 6.30 वाजता डेकेअर सेंटर उघडले नसल्याने ती मुलीला घेऊन आपल्या घरी निघाली.

सकाळी 8 वाजता आरोपी महिला चिमुकलीला तिच्या व्हॅनमध्ये विसरली आणि घरात निघून गेली. मुलीला सीट बेल्ट लावलेला होता, त्यामुळे तिला हालचाल देखील करता आली नाही. 30 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानात कारच्या आत ही चिमुकली बसलेली होती, त्यामुळे तिची प्रकृती खराब झाली. त्यानंतर आरोपी महिला दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास व्हॅनमध्ये परत आली, तोपर्यंत या चिमुकलीचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेने आपत्कालीन सेवेला कॉल करण्याऐवजी मुलीच्या आईला फोन केला आणि मुलीच्या मृत्यूची माहिती दिली. यानंतर आरोपी महिला मुलीचा मृतदेह घेऊन मुलीच्या घरी गेली. तेथून पोलिसांनी मुलीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविला. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत