centre prohibits exports of injection remdesivir till the covid situation in the country improves

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, रेमेडेसिव्हीरची निर्यात थांबवण्याचे निर्देश

कोरोना ग्लोबल देश

नवी दिल्ली : देशात जोपर्यंत कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत रेमेडेसिव्हीर इंजेक्शनची निर्यात थांबवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. वाढत्या कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी औषधांचा तुटवडा भासत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

देशात मागील अनेक दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे देशातील अनेक ठिकाणी औषधांचा तुटवडा जाणवतो आहे. रेमेडेसिव्हीर हे औषध न मिळाल्यामुळे कोरोना बाधित रूग्णांच्या उपचारास उशीर होत आहे. या पार्श्वभूमीवर, जोपर्यंत देशातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत नाही तोपर्यंत इंजेक्शन देशाबाहेर न पाठवण्याचे निर्देश केंद्र सरकाने रेमेडेसिव्हीर तयार करणाऱ्या कंपन्यांना दिले आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत