Chirag Falor

जेईई अॅडव्हान्स २०२० परीक्षेत पुण्याचा चिराग फलोर देशात प्रथम

देश शैक्षणिक

जेईई अॅडव्हान्स २०२० परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. या परीक्षेत पुण्याचा चिराग फलोर हा आयआयटी मुंबई विभागातील विद्यार्थी देशात प्रथम आला आहे. एकूण १ लाख ५० हजार ८३८ विद्यार्थांनी ही परीक्षा दिली होती. पेपर १ आणि २ साठी एकूण ४३ हजार २०४ विद्यार्थी जेईई अॅडव्हान्स २०२० साठी पात्र ठरले होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

चिराग फलोर हा या परीक्षेत कॉमन रँक लिस्टमध्ये टॉपर ठरला असून, त्याने ३९६ पैकी ३५२ गुण मिळवले आहेत. आयआयटी रुरकी झोनच्या कनिष्क मित्तल कॉमन रँक लिस्टमधील १७ व्या क्रमांकासह विद्यार्थीनींमध्ये टॉपर आहे. त्यांनी ३९६ पैकी ३१५ गुण मिळवले आहेत.

यंदा निकाल घोषित करते वेळी बारावीच्या गुणांचा विचार केला गेला नाही. नव्या नियमानुसार निर्णय घेण्यात आला आहे. या अगोदर जेईई अॅडव्हान्समध्ये भाग घेण्यासाठी इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांना ७५ टक्के गुण मिळवणे गरजेचे होते. या वर्षी करोना महामारीमुळे CBSE आणि CISCE सह अनेक बोर्डांनी विशेष योजनांच्या आधारावर निकाल जाहीर केले आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत