Gang rape of a 25-year-old woman in Gurugram
देश

गुरुग्राममध्ये २५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार

गुरुग्राम :  एका २५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी उघडकीस आली आहे. गुरुग्रामधील डीएलएफ फेज २ परिसरातील एका रियल इस्टेट डीलरच्या कार्यालयात ही धक्कादायक घटना घडली आहे. अत्याचार करतेवेळी या महिलेस अमानुष मारहाण देखील केली गेली. यामुळे ही महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दीड वाजेच्या सुमारास घडली. जेव्हा दिल्लीत राहणारी ही महिला सिकंदरपूर मेट्रो स्थानकावर उभी होती. महिलेने सांगितल्याप्रमाणे ती सर्वप्रथम एका व्यक्तीला भेटली व त्याच्यासोबत चर्चा झाल्यानंतर ती त्याच्या दुचाकीवर बसून डीएलएफ फेज २ येथील कार्यालयात गेली. ज्या ठिकाणी तो हेल्पर व क्लिनर म्हणून काम करत होता.

पोलिसांना महिलेने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा ती महिला त्या ठिकाणी पोहचली, तेव्हा त्या व्यक्तीचे तीन मित्र त्या ठिकाणी उपस्थित होते. हे पाहून तिला असुरक्षित वाटू लागल्याने ती त्या ठिकाणाहून निघण्याचा प्रयत्न करू लागली. मात्र त्या चौघांनी तिला जाऊ दिले नाही. यानंतर त्यांनी तिला धमकावत व मारहाण करत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्या चौघांनी तिला लाथा बुक्यांनी मारहाण केली. तिचं डोकं भिंतीवर व फरशीवर आपटल्याने ती गंभीर जखमी झाली.

या घटनेनंतर चौघांनी महिलेला रस्त्यावर सोडून ऑफिस बंद करून दुचाकीद्वारे घटनास्थळावरून पळ काढला. गंभीर जखमी अवस्थेतील महिलेला पाहून काही खासगी सुरक्षा रक्षकांनी याबाबत पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी या महिलेस खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या चौघांपैकी तीन जण हे फुड डिलेव्हरी सर्विस कंपनीत कामाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत