government has already made an appointment for the second dose of the kovishield vaccine
देश

कोविशिल्डच्या दुसऱ्या डोससाठी अगोदरच घेतलेल्या अपॉईंटमेंटचं काय होणार? सरकारने केलं स्पष्ट..

नवी दिल्ली : कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या डोससाठी अगोदरच घेतलेली वेळ म्हणजेच अपॉईंटमेंट वैध असेल आणि को-विन पोर्टलवर ती रद्द केला जाणार नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज स्पष्ट केले. मंत्रालयाने म्हटले आहे की को-विन पोर्टलमध्ये आवश्यक बदल केले गेले आहेत, परिणामी लाभार्थ्याला पहिला डोस घेतल्यानंतर 84 दिवसांच्या आत ऑनलाइन अपॉईंटमेंट मिळू शकणार नाही.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

13 मे रोजी केंद्राने कोविशिल्ड लसीच्या पहिल्या आणि दुसर्‍या डोसमधील कालावधी 12-16 आठवड्यांपर्यंत वाढविला आहे. भारत सरकारने या बदलाबाबत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना माहिती दिली आहे. कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस घेण्यास 12-16 आठवड्याच्या अंतराने सूचित करण्यासाठी को-विन पोर्टलमध्ये देखील आवश्यक बदल केले गेले आहेत.

सध्या को-विन पोर्टलवर दुसऱ्या डोससाठी 84 दिवसांपेक्षा कमी कालावधीत ज्यांनी अॅपॉईंटमेंट घेतली आहे, त्यांना डोस न मिळताच माघारी यावे लागत आहे. मात्र, ज्यांनी यापूर्वी दुसऱ्या डोससाठी अपॉईंटमेंट घेतली आहे, ती वैध राहणार आहे. परंतु, पहिला डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांना दुसर्‍या डोस 84 दिवसांनंतर घेण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत