supreme court rejects parambir singh plea over case transfer other states
देश महाराष्ट्र

ब्रेकिंग! राज्य सरकारला मोठा झटका, परमबीर सिंग प्रकरणाची चौकशी CBI कडे सोपविण्याचे आदेश

नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला मोठा दणका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

गुरुवारी परबीर सिंग प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आपली भूमिका मांडताना सांगितले की, कोणत्याही तपासासाठी राज्याची संमती आवश्यक आहे. सीबीआयच्या तपासामुळे पोलिसांच्या मनोबलावर परिणाम होईल, असे सरकारी वकिलांनी सांगितले. महाराष्ट्र सरकार सीबीआय चौकशीच्या बाजूने नाही, असेही सरकारचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलिसांनी नोंदवलेले सर्व खटले सीबीआयकडे वर्ग केले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांना आठवडाभरात रेकॉर्ड सीबीआयकडे सोपवण्यास सांगितले आहे. माजी पोलीस आयुक्त आणि माजी गृहमंत्री एकमेकांवर ज्या प्रकारचे आरोप करत आहेत त्यामुळे लोकांचा व्यवस्थेवरील विश्वासाला तडा गेला असून सत्य बाहेर येणे महत्त्वाचे आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत