मुंबई : मुंबईत उद्यापासून (१७ मे) शुक्रवार (२१ मे) पर्यंत सलग पाच दिवस दहा टक्के पाणीकपात केली जाणार आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे बंधाऱ्यातील न्यूमॅटिक झडपांची तातडीने दुरुस्ती करायची आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणीकपातीचा त्रास सोसावा लागणार आहे.
भातसा धरणातून पिसे बंधाऱ्यात पाणी सोडले जाते. पिसे बंधाऱ्यातून पाणी शुद्धीकरण केंद्रात आणून त्याच्यावर प्रक्रिया केली जाते. हे पिण्यायोग्य केलेले पाणी मुंबईला पुरवले जाते. या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पिसे बंधाऱ्यातील न्यूमॅटिक झडपांच्या दुरुस्तीच्या कामाचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला आहे. दुरुस्तीच्या कामाची ऑर्डर निघाली आहे.
मुंबई मनपाने नागरिकांना आवाहन केले आहे की पाण्याचा आवश्यक तेवढा साठा करावा आणि पाण्याचा जपून वापर करावा, तसेच प्रशासनास सहकार्य करावे.
पिसे बंधाऱ्यावरील न्युमॅटिक झडपांच्या तातडीच्या दुरुस्तीमुळे
दिनांक १७ मे २०२१ ते २१ मे २०२१ दरम्यान मुंबईत १० टक्के पाणीकपात pic.twitter.com/iPCZcPMcIb— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 15, 2021




