मुंबई : बिहार निवडणुकीमध्ये मात्र शिवसेनेने लढविलेल्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. यावरूनच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी शिवसेनेला ‘शवसेना’ म्हटले आहे. तसंच शिवसेनेने बिहारमध्ये आपल्या साथीदारांना ठार मारल्याचा टोला हाणला आहे. महाराष्ट्र कुठेही नेऊन ठेवला असेल पण बिहार योग्य ठिकाणी नेऊन ठेवल्याबद्दल धन्यवाद.., अशी खोचक प्रतिक्रिया अमृता फडणवीस आपल्या ट्विटमध्ये दिली आहे.
का हय ये – शवसैना ने अपने ही साथियों की लाशें बिछा दी बिहार मे !
काय चाल्लय तरी काय – शवसेनेने आपल्याच साथीदारांना ठार मारले बिहार मधे !
महाराष्ट्र कुठे ही नेला असो पण बिहार योग्य ठिकाणी नेउन ठेवल्या बाबत धन्यवाद ? #Bihar #BiharResult pic.twitter.com/mMGT5Sgn3w— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) November 12, 2020