Sudha Chandran's father and veteran actor KD Chandran dies

दुःखद : सुधा चंद्रन यांचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते केडी चंद्रन यांचे निधन

मनोरंजन

मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर येत आहे. अभिनेत्री सुधा चंद्रन यांचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते केडी चंद्रन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. सुधा चंद्रन यांनी वडिलांच्या मृत्यूची पुष्टी केली. आज (१६ मे) सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 86 व्या वर्षी केडी चंद्रन यांनी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

काही दिवसांपासून केडी चंद्रन यांची प्रकृती ठीक नव्हती. 12 मे रोजी त्यांना जुहूच्या क्रिटी केअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना डिमेंशिया म्हणजेच स्मृतिभ्रंश देखील झाला होता. आज त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

के.डी. चंद्रन यांच्या चित्रपट कारकीर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी बर्‍याच चित्रपटांमध्ये अभिनय केलेला आहे. कोई मिल गया, चायना गेट, कॉल, हम हैं राही प्यार के, तेरे मेरे सपने, जुनून, हर दिल जो प्यार करेगा, शरारत, मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूं, अशा चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला. थोड्याच चित्रपटांमध्ये काम करून देखील केडी यांनी लोकांच्या हृदयात एक वेगळी ओळख निर्माण केली होती. चित्रपटांशिवाय ते अनेक टीव्ही मालिकांमध्येही दिसले आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत